Vadhdiwas
YouTube Viewers YouTube Viewers
635 subscribers
2,588 views
0

 Published On Apr 30, 2024

लोकशाही मूल्य जपणारा आपला देश आणि आपण सर्वजण ... ग्रेट आहोत...

लोकशाही मूल्य जपणाऱ्या देशांमध्ये आपला भारत देश जगातला सर्वात मोठा आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांकरवी चालवलेले राज्य, ही लोकशाहीची संकल्पना रुजवणारा आपला देश आणि आपण सर्व नागरिक खरच ग्रेट आहोत.

निवडणूक प्रक्रिया सुरु असताना सर्वांचे लक्ष फक्त राजकीय कुरघोडी करणाऱ्या सत्ताधार्यांकडे आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांकडे असते. पण, करोडो नागरिकांना त्यांच्या मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या लाखो सरकारी कर्मचार्यांकडे आपल्या सर्वांचे दुर्लक्ष होते. त्यांच्या मेहनतीमुळेच आज आपल्या देशातल्या निवडणुका अत्यंत शिस्तबद्धपणे आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडतात.

डोंबिवली नागरी सहकारी बँक देशाच्या निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मनःपूर्वक अभिवादन करते आणि सर्व नागरिकांना आवाहन करते की निवडणुकीचा दिवस हा सुट्टीचा दिवस नसून लोकशाही बळकट करण्यासाठी मिळालेली संधी आहे.

मतदान करणे हा आपला हक्क आहेच पण लोकशाही मूल्ये टिकविण्यासाठी आपली जबाबदारीही आहे.

"आवर्जून मतदान करा”

उत्तम बँकिंग सोबत सामाजिक बांधिलकी जपणारी आपली बँक....

डोंबिवली नागरी सहकारी बँक

अर्थाला विश्वास मिळे अन विश्वासाला अर्थ मिळे

show more

Share/Embed